अनिल देशमुख १५ फेब्रुवारीला काय करत होते, फडणवीसांचा मोठा खुलासा

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. या आरोपावरून राज्यात तसेच दिल्लीत सुद्धा गदारोळ झालेला पाहायला मिळाला होता.

त्यात शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली होती. तसेच त्यांच्यावर लागवण्यात आलेल्या आरोपावेळी ते कोरोना संसर्गावर उपचार करत असल्याचा दाखला शरद पवारांनी दिला होता. मात्र आज पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी पवारांचे सर्व आरोप खोडुन काढले आहेत.

फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले की, १५ तारखेचा गृहमंत्र्यांची ही कार्यक्रम पत्रिका आहे. १५ तारखेला ते एका खासगी विमानाने आले होते. १५ तारखेला ते आपल्या घरी होते. पण पोलीस विभागाच्या दैनंदिन कामाचा माझ्याकडे एक कागद आहे. त्यात १७ फेब्रुवारीची एक तारीख आहे. त्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतला राहतील.

तर अनिल देशमुख हे दुपारी ३ वाजता सह्याद्रीला येतील. त्यानंतर २४ तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे ११ वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याचं पोलिसांची माहिती आहे. अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे पवारांच्या दाव्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Team Global News Marathi: