आंगणेवाडी यात्रेचा मुहूर्त साधत भाजपची जाहीर सभा; जोरदार करणार शक्तिप्रदर्शन

 

सिंधुदुर्ग | कोकणतील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवणमधील आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा 4 फेब्रुवारीला होत आहे. याचं यात्रेचा मुहूर्त साधत भाजप आंगणेवाडीत जाहीर सभा घेणार आहे. भराडी देवीच्या यात्रेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आंगणेवाडीमधील माळरानावर भाजपने भव्य जाहीर सभा आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग बदलतोय, सिंधुदुर्ग स्थिरावतोय या टॅगलाईनवर ही जाहीर सभा भाजप घेत असून या सभेदरम्यान शक्तिप्रदर्शन करणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणारा सी वर्ल्ड या प्रकल्पाला चालना द्यावी, कोकणातील रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी या व्यासपीठावरुन उपमुख्यमंत्र्यांनी ग्वाही द्यावी, अशी मागणी ‘आम्ही कोकण’च्या वतीने करण्यात येणार आहे.सिंधुदुर्ग बदलतोय, सिंधुदुर्ग स्थिरावतोय या टॅगलाईनवर ही सभा भाजपने आयोजित केली आहे. मालवणमधील सी वर्ल्ड प्रकल्प आणि रिफायनरी झाल्यास कोकणातून मुंबई-पुण्यासारख्या शहरात जाणाऱ्या मुलांना रोजगार उपलब्ध होऊन ते याच ठिकाणी स्थिर होतील.

सिंधुदुर्ग जिल्ह्याने भाजपला ग्रामपंचायतीपासून सर्व निवडणुकांमध्ये भरभरुन दिले. आता भाजपचे सरकार राज्यात आलं असून त्यांनी रोजगार उपलब्ध करुन स्थानिकांना इथेच स्थिर होण्यासाठी संधी द्यावी, असं वक्तव्य भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केलं आहे. दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात या देवीची जत्रा रंगते. आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. त्यासोबतच विविध पक्षाचे राजकीय नेते या यात्रेत सहभागी होतात. राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता भाजप देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आंगणेवाडी जवळील भोगलेवाडी येथील माळरानावर घेण्याच्या तयारीत आहे.

Team Global News Marathi: