पुन्हा एकदा योगगुरू बाबा रामदेव यांचे मुस्लिम धर्मविरोधात वादग्रस्त विधान

 

योगगुरू बाबा रामदेवयांनी राजस्थानच्या बाडमेरमध्ये पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून नवा वाद अंगावर ओढवून घेतला आहे. बाबा रामदेव यांनी बाडमेर येथील एका धार्मिक सभेत इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माविषयी वादग्रस्त विधान केले आहे. मुस्लिम दहशतवादी असला तरी तो नमाज नक्कीच अदा करतो. अशा लोकांना इस्लामचा अर्थ फक्त नमाजपर्यंत समजतो. पाच वेळा नमाज पठण करा आणि तुम्हाला जे काही पाप करायचे आहे ते करा. हिंदू मुलींना उचलून न्या किंवा जिहादच्या नावाखाली दहशतवादी बनून तुमच्या मनात येईल ते करा. पण, हिंदू धर्मात असे नाही, असे बाबा रामदेव म्हणाले.

ख्रिश्चन धर्माबाबतही बाबा रामदेव यांनी वादग्रस्त विधान केले आहे. चर्चमध्ये जा आणि मेणबत्ती लावा आणि येशू ख्रिस्तासमोर उभे राहा. सर्व पापे धुतली जातात. पण, हिंदू धर्मात असे केले जात नाही. मी कोणावरही टीका करत नाही, पण हे लोक असेच आहेत. काही जण संपूर्ण जगाला इस्लाममध्ये धर्मांतरित करत आहेत, तर काहींना ते ख्रिश्चनमध्ये धर्मांतर करत आहेत, असे बाबा रामदेव म्हणाले.

याचबरोबर, बाबा रामदेव म्हणाले, सनातन धर्म हा इतर धर्मांसारखा नाही. ब्रह्म मुहूर्तावर उठावे, सकाळी देवाचे नामस्मरण करावे व योगासने करावीत. हिंदू धर्म आपल्याला जीवन चांगल्या पद्धतीने कसे जगायचे हे शिकवतो. सदाचारी वागणूक असावी. आपले वर्तनही असेच असावे. लोकांनी हिंसा आणि खोटेपणापासून दूर राहावे. माणसाने भांडणे, पाप आणि गुन्हेगारी यापासून दूर राहावे, अशी शिकवण हिंदू धर्म देतो, असे बाबा रामदेव यांनी सांगितले.

Team Global News Marathi: