अंधेरी पूर्वमधील पोटनिवडणुकीसाठी 7 उमेदवार रिंगणात, 6 नोव्हेंबरला निकाल

 

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीवरून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यातून अखेर आज मतदान होतंय आणि 6 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीत एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरीत पोटनिवडणूक लागली.

या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान भाजपने ऋतुजा लटकेंविरोधात मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक चर्चेत आली होती. मात्र राज ठाकरेंसह शरद पवारांनी विनंती केल्यानंतर भाजपने अंधेरीच्या मैदानातून माघार घेतली.

अंधेरी पोटनिवडणूकीसाठी आज मतदान. मतदारांना नोटा देऊन नोटा बटण दाबण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा उमेदवार ऋतुजा लटकेंचा आरोप. निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून तक्रार दाखल. अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी उद्या मतदान. 256 मतदान केंद्रांवर सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत दोन लाख 71 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार. पोलिसांसह 1600 कर्मचारी आणि CRPF च्या 5 कंपनी तैनात आहेत.

Team Global News Marathi: