अंधेरीतील राधाकृष्ण रेस्तराँमधील १० कर्मचारी निघाले कोरोना पॉझिटिव्ह .

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपला डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या सरकारच्या चिंतेत अधिक भर घालत आहे. त्याचमुळे राज्यात विशेष करून मुंबईत हॉटेल आणि रेस्तराँमध्ये कोविड संदर्भातील नियम अधिक कडक पाळण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता मुंबई मधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुंबई मनपाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील अंधेरी येथील राधाकृष्ण रेस्तराँमधील १० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. या रेस्टॉरंटमध्ये ३५ कर्मचारी कामावर आहेत. करोना संसर्गाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांना बीकेसीतील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून, इतरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच रेस्टॉरंट दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.

मुंबई मनपाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईचा डबलिंग रेट आता २३८ दिवसांवर गेला आहे. अर्थात आज असलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी २३८ दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र, त्याचवेळी मुंबईतल्या एकूण करोनाबाधितांची संख्या देखील वाढत आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार मुंबईत २४ तासांत ११०३ नवे करोनाबाधित सापडले आहेत.

Team Global News Marathi: