अंधेरी पोटनिवडणूक |पाच फेरींचा निकाल जाहीर, ऋतुजा लटके आघाडीवर

 

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके या आघाडीवर तर दुसऱ्या क्रमांकांवर नोटा आहे तर तिसऱ्या क्रमांकावर ‘आपकी अपनी पार्टी पीपल्स’चे उमेदवार बाला नाडार हे आहेत

पहिल्या फेरीत ऋतुजा लटके यांना ४,२७७ मते, नोटाला ६२२ मते मिळाली, तर बाला नाडार – २२२, मनोज नाईक – ५६, मीना खेडेकवर- १३८, फरहान सय्यद – १०३, मिलिंद कांबळे- ७९, राजेश त्रिपाठी- १२७ एवढी मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीत लटके यांना ७,८१७ मते मिळाली, तर नोटाला १,४७० मते मिळाली आहेत.

तिसऱ्या फेरीतदेखील ऋतुजा लटके यांनी आघाडी कायम ठेवली आहे. ऋतुजा लटके यांना तिसऱ्या फेरीअंती ११३६१ मते मिळाली आहेत. तर नोटाला २,९६७ मते मिळाली. चौथ्या फेरीतही ऋतुजा लटके १४,६४८ मतांनी आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर नोटा असून ३५८० मते मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरील बाळा नाडार यांना ५०५ मते मिळाली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील पाचव्या फेरीत ऋतुजा लटके यांना १७२७८ मते मिळाली आहेत.

अंधेरी पूर्व मतदारसंघात एकूण २५६ केंद्रावर या पोटनिवडणुकीचे मतदान झाले. या मतदारसंघात २ लाख ७१ हजार ५०२ मतदार असून एकूण ३१.७४ टक्के मतदान झाले. देशभरात सहा राज्यांतील सात विधानसभा सीटवर पोटनिवडणूक झाली आहे. यावर आज (६ नोव्हेंबर) मतमोजणी होत असून तीन भगवा दल, दोन काँग्रेस आणि एक शिवसेना आणि राजद अशा पक्षांकडे असलेले मतदारसंघ आहेत.

Team Global News Marathi: