एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यामागे कोणाचा हात? फडणवीस म्हणतायत की,

 

शिवसेनेत उभी फुट पडल्याने महाविकास आघाडीची सत्ता गेली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत युती सरकारची स्थापना केली.दरम्यानच्या काळात भाजपकडे जास्त आमदार असल्याने भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशी चर्चा सुरू असताना अचानक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याने राज्यातील जनतेसह सर्वच क्षेत्रातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या.

भारतीय जनता पक्षाची ही नवी चाल पुढच्या राजकारणात नेमकं काय घडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री मुख्यमंत्री करण्याचा मूळ निर्णय कोण घेतला यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका माध्यमसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितलं.

यावेळी फडणवीस म्हणाले की, सत्तांतर घडत असताना सर्व घडामोडी क्रिकेटच्या टी-२० सामन्याप्रमाणे घडत होत्या. जसजसा वेळ पुढे जात होता तस तसे कधी काय निकाल लागेल, याचा अंदाज कोणालाच बांधता येत नव्हता.

परिस्थितीनुसार गोष्टी बदलत गेल्या. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय माझ्या सहमतीने झाला. यापुढे जाऊन मी असं म्हणेन की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर मी जबाबदारीने हे वक्तव्य करतोय.

Team Global News Marathi: