अन लाडक्या बॉडीगार्डच्या लग्नात पोहोचला कार्तिक आर्यन; होतंय सर्वत्र कौतुक

 

अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या अपकमिंग ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाच्या शुटींगमध्ये बिझी होता. नुकतंच त्याचं शुटींग पूर्ण झालंय. सिनेमाचं शुटींग पूर्ण होताच कार्तिक आर्यन थेट लग्नात पोहोचला आहे. हे लग्न त्याच्यासाठी फार खास आणि घरचं लग्न होतं. कार्तिक आर्यननं नुकतेच सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो शेअर केलेत. कार्तिकनं त्याच्या बॉडिगार्डच्या लग्नाला हजेरी लावली होती.

मोठं फेम मिळवलेलं असूनही आपल्या बॉडीगार्डच्या लग्नाला जाणाऱ्या कार्तिक आर्यनचं सर्वत्र कौतुक होतं. लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्न जरी कार्तिकच्या बॉडीगार्डचं असलं तरी चाहत्यांनी मात्र कार्तिकला चांगलेच प्रश्न विचारलेत. कार्तिक आर्यननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये कार्तिकने क्लोजअप शॉर्ट क्लिक केला आहे.ज्यात कार्तिक त्याच्या बॉडीगार्ड सचिन आणि त्याची पत्नी आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये कार्तिक आर्यन त्याच्या सगळ्या पाहुण्यांबरोबर दिसत आहे.

आपल्या बॉडीगार्डच्या लग्नाचे फोटो कार्तिक आर्यननं शेअर करत लिहिलंय, अभिनंदन! सचिन आणि सुरेखा. तुमचं वैवाहिक आयुष्य सुखात जावो. कार्तिकनं ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेकांनी सचिन हा कार्तिकचा बॉडीगार्ड असल्याचं ओळखलं आहे. मागील वर्षी कार्तिकनं बॉडीगार्ड सचिनचा वाढदिवस देखील सेलिब्रेट केला होता. यावेळी कार्तिकनं सचिनच्या लग्नाला हजेरी लावली

Team Global News Marathi: