‘..अन् फडणवीसांचाच करेक्ट कार्यक्रम झाला’; नाना पटोलेंचा जोरदार टोला

 

मी सांगितलं होतं मी पुन्हा येईन. 106 वा आमदार द्या करेक्ट कार्यक्रम आम्ही करतो, असं म्हणालो होते. बोलल्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर प्रत्युत्तर देत नाना पटोले यांनी फडणवीसांनाच टोला लगावला आहे. फडणवीस यांचाच कार्यक्रम करेक्ट झाला असल्याचं पटोले म्हणाले आहेत.

आज सकाळी पहाटे मॉर्निंग वॉकला निघालेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर पलटवार केला. मुख्यमंत्री राहिलेले आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले देवेंद्र फडणवीस हे आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचाच कार्यक्रम हा करेक्ट झाला आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांनाच टोला लगावला आहे.

आम्ही सांगितलं होतं की 106 वा आमदार द्या करेक्ट कार्यक्रम आम्ही करतो. आम्ही करेक्ट कार्यक्रम केला आणि तुमच्या तसंच पांडुरंगाच्या आशीर्वादाने सरकार आलं, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता.

Team Global News Marathi: