मॅजिक फिगर महाविकास आघाडीकडे असणार, अमोल मिटकरी यांचं सूचक विधान

 

राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत. शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादीचे 12 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी शहाजीबापू पाटील यांना सुनावले आहे.

शहाजीबापूंनाही माहीत आहे कोण-कोणाच्या संपर्कात आहेत. फक्त पक्षाच्या काही मर्यादा असल्याने मी गौप्यस्फोट करणार नाही. हे अधिवेशन आटोपू द्या. काही दिवसातचं तुम्हाला मोठी ब्रेकिंग दिसेल. त्यानंतर आपण शहाजीबापूंना विचारू की, तुमच्या सोबतचे किती आमदार अस्वस्थ आहेत.शिंदे गट आणि भाजपचे सरकार लवकरच कोसळणार , असे विधान जयंत पाटील यांनी केले.

पाटलांच्या विधानानंतर अजित पवार म्हणाले, 145 चा आकडा असल्याशिवाय सरकार स्थापन करू शकत नाही, हे जरी बरोबर असेल. हा मॅजीक फिगर महाविकास आघाडीकडे आहे, असे मिटकरी म्हणाले.येत्या आषाढी एकादशीची पूजा महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्री करतील, हे पुन्हा सांगतो. फडणवीस सरकारमधील आमदार तसेच बंडखोर आमदार यांनीही हे गांभीर्याने घेतले पाहिजे, असे मिटकरी म्हणाले.

 

Team Global News Marathi: