नीता ढमालेंचे राष्ट्रवादी,भाजपसमोर तगडे आव्हान; मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली

नीता ढमालेंचे राष्ट्रवादी,भाजपसमोर तगडे आव्हान; मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली

 

ग्लोबल न्यूज : पाच जिल्हे आणि 58 तालुके असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराला गती आली आहे. नीता ढमाले यांचा सामाजिक कार्यात सहभाग व आत्तापर्यंत पदवीधरांसाठी केलेले काम पाहता त्यांच्या विरोधात भाजप व राष्ट्रवादीने तुल्यबळ उमेदवार दिल्यामुळे या दोन राजकीय पक्षासमोर कडवे आव्हान उभे ठाकले आहे. या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.

पुणे मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. पदवीधरांचे प्रश्‍न आणि त्यांचा सर्वांगिण विकास या मुद्‌द्‌यांवर आतापर्यंतच्या निवडणुका होत होत्या.

मात्र, गेल्या 20 वर्षांत इच्छुकांना पदवीधराचे दार खुणावू पाहत आहे. त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतील इच्छुकांना हा मतदारसंघ सोयीचा वाटत आहे.

त्यामुळे ही निवडणूक आता अटीतटीची होऊ लागली आहे. पुणे शहरातील हक्‍काचा मतदार आणि त्याभोवती विजयाचे समीकरण, अशी ओळख या निवडणुकीची होत होती. त्यामुळे राजकीय पक्षांना हा मतदारसंघ सुरक्षित होता. 2003 पासून या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलत गेली आहेत.

पुण्यापेक्षा जादा मतदारसंख्या ही सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आहे. त्यामुळे या जिल्ह्यांनी पुणे शहराला ओव्हरटेक केले आहे. मताधिक्‍यासाठी हे जिल्हे नीता ढमाले यांना अनुकूल ठरत आहे. याचा प्रत्यय मागील निवडणुकीतही आला आहे. 2010, 2015 मधील निवडणुकाही चुरशीच्या झाल्या होत्या.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्थितीचा विचार करता नीता ढमाले व भाजप राष्ट्रवादीची चुरस पाहावयास मिळत आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यामुळे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत.

नीता ढमाले यांचे कार्य मतदारांना माहिती आहे. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीने दिलेले उमेदवार हे कारखानदारीची निगडित असल्यामुळे त्यांचा आणि या मतदारसंघाचा ताळमेळ लागता लागेना झाला आहे. नीता ढमाले यांच्यासाठी  फळी सक्रिय झाली आहे.

दरम्यान, नीता ढमाले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्ते संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, विद्यार्थी संघटना आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या नेत्यांन सोबत घरोब्याचे संबंध आहेत तसेच माजी आमदार शरद ढमाले यांची तगडी फौज नीता ढमाले यांच्या सोबत असल्यामुळे याचा उमेदवारांना फटका बसणार आहे.

पुणे मतदारसंघातील 58 तालुक्‍यांमध्ये इंदापूरची मतदारसंख्या सरस आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदारसंख्या या तालुक्‍याची आहे. सुमारे 10 हजार 861 मतदार या निवडणुकीत निर्णायक कौल देऊ शकतात. त्यामुळे नीता ढमाले यांच्यामुळे
राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: