मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सतत आपल्या गाण्यामुळे आणि वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असताना त्यानिमित्तानं अमृता फडणवीस यांनी गणेश वंदना हे गाणं गायिले आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
गणेश वंदना असं या गाण्याचं नाव असून या गाण्यातून एक सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. भक्तीचे दुसरे नाव सेवा, असा सकारात्मक संदेश गाण्यातून देण्यात आला आहे. अमृता फडणवीस यांनी कुटुंबातील प्रमुख स्त्रीची भूमिका साकारली आहे. अमृता फडणवीस यांच्या या गाण्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. तसेच नेटकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या या गाण्याचे कौतुक केले आहे.
या गाण्यामध्ये संपूर्ण कुटुंब बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असताना एकीकडे घरातील स्त्रीला कामावर रुजू होण्यासाठी बोलावणं येतं. ही स्त्री डॉक्टर आहे. घरातील जबाबदाऱ्या पार पाडून ती रुग्णालयात रुग्णसेवेसाठी सज्ज होते. तिच्या कुटंबातील इतर लोकही तिला पाठिंबा देतात, असं या गाण्यात दाखवण्यात आलं आहे. सध्या या गाण्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1433680216962912259