आमदार नितेश राणे यांचा सोमवारी निकाल,अटकेपासून दिलेला दिलासा कायम

 

मुंबई : आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय यासंबंधी सोमवारी फैसला सुनावणार आहे.संतोष परब यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी हा खटला सुरु आहे. पण विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे बघून म्यॉव म्यॉव करून प्रकरण राज्य सरकारला झोंबल्याने आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई करणयात येत असल्याचा दावा नितेश राणेंच्या वतीनं करण्यात आला.

मात्र दुसरीकडे शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरण हे त्या आधीचं असून या दोन घटनांचा कोणताही संदर्भ लागत नसल्याचं राज्य सरकारच्या वतीनं न्यायालयात स्पष्ट करण्यात आलं आहे. आता या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून त्यावर न्यायालय सोमवारी आपला निकाल देणार आहे. पण तोपर्यंत आमदार नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण वाचा

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत सतिश सावंत यांच्या पॅनलचे निवडणूक प्रचारक संतोष परब यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला आमदार नितेश राणे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप करून तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), कलम १२० (बी) (गुन्हेगारी कट रचणे), कलम 34(समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे.

Team Global News Marathi: