तो पर्यंत रस्ते सुधारणार नाहीत असे म्हणत अमित ठाकरेंनी खड्ड्यातील प्रवास टाळून लोकल पकडली

 

मुंबई | मुंबईच्या रस्त्यांत पडलेल्या खड्ड्यांवरून भाजप आणि मनसेने मुंबई महानगर पालिकेमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेला घेरले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मुंबईच्या रस्त्यावरचा खड्ड्यातील प्रवास टाळून कल्याणला जाण्यासाठी थेट लाेकल पकडली होती. यावेळी मनसेसह भाजपने पालिकेतील सत्ताधार्यांना लक्ष केले आहे. रस्त्यांवर खर्च केलेले काेट्यावधी रुपये खड्ड्यात गेल्याचा आराेप करीत भाजपने शिवसेनेनेचे वाभाडे काढले आहेत.

आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे हे आज सकाळी पक्ष बांधणीसाठी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीसाठी कल्याणला रवाना झाले. त्यांनी दादर रेल्वे स्थानाकातून कल्याणला जाणारी लाेकल पकडली. मुंबईच्या रस्त्यातील खड्ड्यातून प्रवास करणे टाळून त्यांनी पालिकेतील सत्ताधार्यांच्या खड्डे दुरूस्तीतील अपयशावर या कृतीतून बाेट ठेवले. यापूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी खड्ड्यांवरून सत्ताधार्यांवर टीका केली हाेती. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनेही शिवसेनेविराेधात आता दंड थाेपटले आहेत.

त्याच प्रमाणे भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही महापाैर किशाेरी पेडणेकर यांना थेट लक्ष करीत रस्त्यांची चाळण झाल्यामुळे महापाैरांची धावाधाव सुरू झाल्याची टीका केली आहे. शेलार यांनी मुंबईतील रस्त्यांवर 48 कोटी रुपये खर्चूनही रस्त्यांची दुर्दशा झाल्याचा आराेप केला आहे. खड्ड्यांवरून आता थेट शिवसेना आणि पालिका प्रशासनावर भाजपचा भडिमार हाेवू लागला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या निमित्ताने मनसे आणि भाजप यांच्या संभाव्य युतीचा अजेंडा दिसू लागला आहे.

Team Global News Marathi: