सर्व विभागांना काटकसरीने खर्च करण्याचे वित्तमंत्री अजित पवारांचे आदेश

कोरोना संकटांमुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य यंत्रणेवर राज्य सरकारचा पैसा खर्च झाल्याचे चित्र दिसून आले होते. त्यात कोरोनामुळे राज्याच्या उत्पन्नावर सुद्धा याचा गंभीर परिणाम झाल्याचे दिसून आले होते. त्यात केंद्राने जीएसटी चा परतावा न दिल्यामुळे राज्याची तिजोरी खाली झाली होती.

अशातच आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सर्व विभागांना काटकसर करण्याचे आवाहन दिले आहे. त्यात राज्याच्या तिजोरीवर एक लाख कोटी रुपयांची आर्थिक तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत सर्वच विभागांनी काटकसर करावी अशा सूचना अजित पवार यांनी राज्य सरकारच्या सर्व विभागांना दिल्या आहेत.

राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत वित्त विभागाकडून मंत्रिमंडळाला बुधवारी सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणानंतर अजित पवार यांनी याविषयीच्या सूचना प्रशासकीय विभागांना दिल्या. राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला तेव्हा ९५११ कोटींची तूट अपेक्षित होती व ती आता एक लाख कोटींपर्यंत जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

Team Global News Marathi: