अमित शहा एकनाथ खडसे यांच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

 

अमित शहा आणि एकनाथ खडसे यांच्या भेटीवर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला सुरवात झाली असून यावर आता राष्ट्र्वादीने भाष्य केले आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जे वृत्त माध्यमांमधून दिले जात आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ खडसे यांच्या भेटीची चर्चा आहे, ती भेट झालेली नाही. दोघांमध्ये फोनवर चर्चा झाली आहे. ही भेट घेण्यापूर्वी खडसे यांनी संपूर्ण विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांना सांगितला होता, अशी माहिती देत पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे हे अमित शहांना भेटणार होते. खडसे एकटे जाणार नव्हते. पवार साहेबांसोबत ते जाणार होते. अजून ती भेट झालेली नाही. त्यामुळे खडसे भाजपमध्ये जाणार, हे जे वृत्त दिले जात आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. खडसेंनीही याबाबत खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर विधानपरिषदेचे पद आणि महाराष्ट्रातल्या पक्षाच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या खडसे यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा विषय चुकीचा आहे अशी काही परिस्थिती नाही, असं महेश तपासे म्हणाले

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे याना शिवाजीपार्कव म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे, या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करते. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची जवळपास गेल्या ४० वर्षांपासूनची परंपरा आहे. ही परंपरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुढे नेत आहेत. अनेक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते या दसरा मेळव्यातील भाषण ऐकत असतात. यामुळे त्यांना मिळालेली परवानगी ही योग्यच आहे, असं तपासे म्हणाले.

Team Global News Marathi: