अमित भाईच्या पायगुणाने आमचं सरकार याचा असेल तर येईल – चंद्रकांत पाटील

अमित शहा यांच्या पायगुणाने आघाडीचे सरकार जावो असा टोला भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला लगावला होता. शहा रविवारी राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उदघाटन करण्यासाठी सिंधुदुर्गात आपले होते. आता त्या पाटोपाठ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पैल यांनी सुद्धा यावर भाष्य केले आहे.

अमितभाईंच्या पायगुणाने वैभववाडीतील ६ नगरसेवक गेले त्याचा काही संबंध नाही. अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचे असेल तर येईल. मी काही भविष्यकार नाही” असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुणे येथे बोलत होते.

पुढे शहा यांनी केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, खरं बोलले की झोंबते, अमित शाह खरं बोलले ते फार झोंबले त्यामुळे ज्याला ज्याला जसे जमले ज्यांनी माईल्ड प्रतिक्रिया काढली, त्यांना दम दिला गेला. दुसऱ्या दिवशी त्याच माणसाने पुन्हा स्ट्रॉंग प्रतिक्रिया द्यायची, त्यामुळे अमित शाह शिवसेनेबद्दल जे बोलले ते खरे होते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

Team Global News Marathi: