राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी पोहचले आजेडीचे तेजस्वी यादव

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार याच्या दांडग्या राजकीय अभ्यासामुळे अनेक राजकीय नेते त्यांना भेटण्यासाठी येतंच असतात. आज देशाच्या राजकारणात शरद पवारांच्या शब्दाला एक वजन आहे. याची प्रचिती शेतकरी आंदोलनात सुद्धा देशाला दिसून आली आहे. त्यात आरजेडीचे युवा नेता तेजस्वी यादव यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.

या भेटीदरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये विविध राजकीय विषयांवर गप्पा झाल्याची माहिती तेजस्वी यादव यांनी ट्विटरवरुन दिली. राज्यसभेचे खासदार असलेले शरद पवार सध्या संसदेच्या अधिवेशनानिमित्त राजधानी दिल्लीत आहेत. पवारांच्या दिल्ली दौऱ्यात तेजस्वी यादव यांनी भेट घेतल्याचे दिसत आहे.

भारतीय राजकारणातील वरिष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. विविध राजकीय विषय आणि मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. कनवाळू नेते, प्रेम आणि जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेल्या शरद पवार यांनी आपल्या अनुभवाच्या पेटाऱ्यातून ज्ञानमोती वेचले असे ट्विट करून तेजस्वी यादव यांनी या भेटीची माहिती दिलेली आहे.

Team Global News Marathi: