अमेरिकन महिला टेनिसपटूने पंतप्रधान मोदी, अमित शाहांवर साधला निशणा |

 

 

नवी दिल्ली | अमेरिकेच्या माजी जगविख्यात टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा नेटकऱ्यांमध्ये चांगलेच चर्चेत ठरत आहेत. या महिला टेनिसपटूने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत थेट जोरदार टोला लगावला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशाह कधीच नव्हते. भारतामधील आतापर्यंत सर्वाधिक चांगल्याप्रकारे लोकशाही मार्गाने काम करणारे ते नेते आहेत,” असं म्हटलं. मोदींना शाह यांनी मोस्ट डेमोक्रॅटीक म्हणजेच लोकशाहीचा सर्वाधिक आदर करणारे अशी उपाधी दिली.

याच ट्विटवर नवरातिलोवाने ट्विट केलं आहे. तिने अमित शाह यांनी केलेल्या या वक्तव्याचा उल्लेख असणाऱ्या वृत्तांकनाच्या पोस्टची लिंक शेअर करणारं ट्विट कोट करुन रिट्विट करताना हे वक्तव्य म्हणजे, “हा माझा पुढचा विनोद आहे,” असं म्हटलं आहे. म्हणजेच मोदी हे सर्वाधिक लोकशाही प्रिय नेते आहेत हे शाह यांचं वक्तव्य हस्यास्पद असल्याचा टोला नवरातिलोवाने लगावला आहे.

Team Global News Marathi: