पुणे जिल्हाधिकाऱ्यांची सलग ७५ तास लसीकरण मोहिमेला रात्री १२ वाजता अचानक भेट

 

पुणे | राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या पुणे जिल्ह्याचा लसीकरणाचा टक्का अधिक वाढविण्यासाठी व शंभर टक्के पात्र लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात मिशन केव्हाच कुंडल अभियान हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेत सलग ७५ तास लसीकरण सुरु राहणार आहे.

त्याच पार्श्वभूमीवर वाघोली येथील प्राथमिक केंद्रात जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख, ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भगवान पवार रात्री १२ वाजाता अचानक भेट दिली. सलग ७५ तास लसीकरण खरच सुरू आहे का याची त्यांनी पाहणी केली. त्यावेळी रात्री १२ नंतरही लसीकरण केंद्रावर गर्दी होती.

देशमुख म्हणाले, ”आपण गेली दीड वर्ष कोव्हीडशी लढतोय. राज्यात पुण्यानं लसीकरणात आघाडी घेतली असून सध्या आपण दुसऱ्या क्रमाकांवर आहोत. महानगपालिका, ग्रामीण भागात आपण विविध पद्धतीने लसीकरण मोहीम राबवली आहे. दिव्यांग, ट्रांसजेंडर, सेक्स वर्कर, बेडवर असणाऱ्या रुग्णांसाठी घरी जाऊन लसीकरण, आदिवासी भागातील लसीकरण, असे विविध उपक्रम राबवले आहेत.

Team Global News Marathi: