अंबानींच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळण्यासाठी बड्या मंत्र्याकडून सुपारी – अविनाश जाधव

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणावरून भाजपने आघाडीचे कोंडी करण्याचा प्रयन्त केला होता. आता त्या पाठोपाठ मनसेने सुद्धा या प्रकरणात मोठे विधान करून आघाडीवर निशाणा साधला आहे.

उद्योगपती अनिल अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळण्यासाठी बड्या मंत्र्याने सुपारी घेऊन रचलेला हा कट आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसईत केला. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक असलेली गाडी ठेवली, ही जीवाला धोका म्हणून, की अंबानी यांच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून, याचा तपास होणे गरजेचे आहे. या सर्व प्रकरणात खूप मोठ्या मंत्र्याचा हात आहे. हा हेलिपॅडला परवानगी मिळवण्यासाठी सुपारी घेऊन रचलेला कट आहे, असा थेट आरोपच अविनाश जाधव यांनी केला आहे.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्या गाडीत पैसे मोजण्याचे मशीन सापडणं, हे फार मोठं गंभीर प्रकरण असल्याचंही अविनाश जाधव म्हणाले. हे सर्व प्रकरण पोलिसांच्या अंतर्गत वादातून बाहेर आले आहे. सध्या या प्रकरणाचा NIA व्यवस्थित तपास करत आहे. तसेच दोन-तीन दिवसात पाटकर परिषद घेऊन मोठा स्फोट घडवून आणणार असल्याचे विधान जाधव यांनी केले आहे.

Team Global News Marathi: