अंबादास दानवेंनी पुन्हा शिंदे-फडणवीस गटाला डिवचले

 

राज्यात शिंदे आणि भाजप सरकारने सत्ता स्थापन केली. सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला. आता दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर गेल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात येत आहे.

विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबदास दानवे यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रतिक्रिया देताना शिंदे, फडणवीस सरकारला धारेवर धरले.मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास काही लोक सोडून जातील अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटत असल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबविण्यात आल्याचा घणाघात दानवे यांनी केला.

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर नेते सोडून जातील अशी भीती शिंदे आणि फडणवीस सरकारला वाटत आहे. त्यांनी अनेकांना शब्द दिला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर काहीजण सोडून जातील या भीतीनेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचे दानवे म्हणाले.मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे.

Team Global News Marathi: