नवाब मलिक यांच्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया,

 

मुंबई |  काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत असून, क्रूझवरच्या कारवाईवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मालदीव आणि दुबईतील फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून एनसीबीच्या वसुलीबद्दल नवाब मलिकांनी गंभीर आरोप केले होते. तसेच राज्य सरकारकडून चौकशी करण्याची मागणी सुद्धा मलिक यांनी केली होती यावर आता खुद्ध गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

ते म्हणाले, ‘राज्य सरकारकडून चौकशीचा प्रश्न नाही कारण, समीर वानखेडे हे एका केंद्रीय एजन्सीद्वारे काम करत आहेत. मला नवाब मलिक यांच्या वक्तव्याबाबत कोणतीही माहिती नाही. त्यांनी मला याबाबत कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. मी त्याच्याकडून याबाबत माहिती घेईन, मात्र सध्या माझ्याकडे कोणतीही माहिती नाही.

तर मलिक यांच्या टिकवेर्वेर् वानखेडे म्हणाले की, ‘मंत्री मलिक यांना माझ्या शुभेच्छा आहेत, मी छोटासा सरकारी नोकर आहे, ते मोठे मंत्री आहेत. जर देशाची सेवा करण्यासाठी, प्रामाणिकपणे काम करण्यासाठी, ड्रग्जविरोधी काम करण्यासाठी ते मला तुरुंगात टाकणार असतील, तर मी त्याचे स्वागत करतो, असंही समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

 

Team Global News Marathi: