सर्वांना एकत्र करण्याची क्षमता आणि संवादाची कसब पवारांकडे नक्कीच आहे – संजय राऊत

 

पश्चिम बंगालचा गड पुन्हा जिंकल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रथमच मंगळवारी भेट घेतली होती. जवळपास अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यानंतर त्या सोनिया गांधी, शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भेटीगाठी व्हायला हव्यात. यातून विरोधी पक्षाच्या ऐक्यावर एकमत होऊ शकेल का यावर चर्चा करणं गरजेचं आहे. ममता बॅनर्जी सोनिया गांघींना भेटत असतील तर चांगलंच आहे. विरोधी पक्षाची एकजूट ही काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज भेटत आहेत. पवार अनेकांना भेटत असतात. पवारांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह म्हणून पाहतो. सर्वांना एकत्र करण्याची क्षमता आणि ताकद आणि संवादाची कसब पवारांकडे नक्कीच आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

Team Global News Marathi: