‘मेडल नक्की कुणी जिंकलंय?’, पोस्टरवर मीराबाई चानूपेक्षा मोदींचा फोटो मोठा!;

 

टोकियामध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्याच दिवशी रौप्य पदाकाची कमाई करुन भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने संपूर्ण जगभरात देशाचे नाव उंचावले आहे, तिच्या या कामगिरीवर सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा तिचे कौतुके केले आहे.

देशाचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन करुन मीराबाईचा सत्कार केला. यावेळी माजी क्रीडा मंत्री आणि सध्याचे कायदेमंत्री किरण रिजिजू देखील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरवरुन काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे.

युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी मीराबाई चानूच्या सत्कार कार्यक्रमातील एक फोटो ट्विट केला आहे. यात कार्यक्रमाच्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसह रौप्य पदक विजेत्या मीराबाई चानूचाही फोटो छापण्यात आला आहे. पण यात मीराबाईपेक्षा पंतप्रधान मोदींचा फोटो मोठा छापण्यात आला होता.

याच मुद्द्यावरुन श्रीनिवास बी.व्ही यांनी ट्विट करत “बॅकग्राऊंडमधील फोटोचा आकार पाहून सांगा की टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक नेमकं कुणी जिंकलं?”, असा सवाल उपस्थित केला. त्यावर ट्विटरकरांनी देखील जोरदार प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

 

Team Global News Marathi: