तर… राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना | प्रतिनिधी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नविन संक्रमितांची रूग्णसंख्या कमी होत आहे. राज्यात कोरोना प्रतिबधंक लसीकरणावर जोर देण्यात येत आहे. तज्ज्ञांकडून वेळोवेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर राज्यात काही दिवसांपूर्वी कोरोनाचे निर्बंध शिथील केले आहेत. त्यातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लाॅकडाऊनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

तिसऱ्या लाटेची चर्चा करत असताना राज्यात जर 700 मेट्रीक टनपेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज भासली तरच राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल आश्वस्त केलं आहे.
देशात सध्या कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत आहेत.

महाराष्ट्रातील रूग्णसंख्या कमी असली तरी केरळमध्ये सलग तीन दिवस रूग्णसंख्या 30 हजारांपेक्षा जास्त आहे. मागील काही दिवसात केरळमध्ये ओनमच्या उत्सवानंतर रूग्णसंख्या वाढली आहे. राज्यातील जनतेने कोरोनाचे नियम पाळायला पाहिजेत, असं आवाहन टोपेंनी केलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: