राष्ट्रवादी आणि सेनेचे चारही उमेदवार विजयी ; अजित पवार अन उद्धव ठाकरे यांनी केले अचूक नियोजन

मुंबई :- अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) खेळलेल्या खेळीमुळे राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) विजयी झाले आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात असल्यामुळे त्यातच गुप्त मतदान असल्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार याची कमाली उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेरीस दोन तासांच्या विलंबानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर निकालात अजित पवारांनी खेळलेली खेळी यशस्वी झाली आणि एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर विजयी झाले.

– राज्यसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं गेलेल्या शिवसेनेनं विधान परिषद निवडणुकीमध्ये परतफेड केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अचूक प्लॅनिंग करून शिवसेनेनं विजयाचा नारळ फोडला आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहे. शिवसेनेचे (Shiv Sena) उमेदवार सचिन आहिर आणि आमशा पाडवी विजयी झाले आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार घडवत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले होते. त्यामुळे विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतली होती. आज मतदान करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांशी चर्चा करून मतदानाला पाठवले होते. यावेळी शिवसेनेनं कोणताही दगाफटका नको म्हणून आपल्याच आमदारांच्या संख्याबळावर आपले उमेदवार विजयी करण्यावर भर दिला होता. त्यानंतर मतमोजणीच्या पहिल्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांनीही २६ मतांचा कोटा पूर्ण करत विजय मिळवला.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: