“आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, समाजासाठी; महाविकास आघाडीचा काउंटडाऊन पहिल्या दिवसापासूनच सुरू”

 

राज्यसभा प्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते या निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला धक्का देत, आपले पाचही उमेदवार निवडून आणले आहेत. भाजपला राज्यसभा निवडणुकीपेक्षाही अधिक मते विधानपरिषद निवडणुकीत मिळाली आहेत. भाजपला राज्यसभा निवडणुकीवेळी पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. तर यावेळी तब्बल १३३ पहिल्या पसंतीची मते मिळाली आहे. यासंदर्भात बोलताना विधान सभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, तर समाजासाठी आणि जनतेसाठी आहे, असे म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडीचा काउंटडाऊन पहिल्या दिवसापासूनच सुरू झाले आहे. मात्र, मी एकच गोष्ट सांगतो, की आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, आमचा संघर्ष समाजासाठी आणि जनतेसाठी आहे. यावेळी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, तुम्हाला कुणाची मते किती फुटलेली दिसतात, हे तुमचे कयास आहेत. या ठिकाणी जी सत्यता आहे. ती केवळ आम्हालाच माहीत आहे. सर्व पक्षातल्या त्या आमदारांचे मी आभार मानतो आणि अपक्षांचेही आभार मानतो, की त्यांनी आमचे पाचही उमेदवार निवडून आणले.

आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मते मिळवली होती. आता आम्ही १३४ मते घेतली आहेत. मी आधीपासूनच सांगत होतो. की महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाहीय. म्हणून आपल्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून आमच्या पाचव्या उमेदवाराला आमदार मते देतील आणि तेच येथे बघायला मिळाले आहे, असे फडणवीस म्हणाले.

Team Global News Marathi: