अलर्ट | राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज, उद्या अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

 

राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 21 एप्रिल आणि 22 एप्रिल या दोन दिवसांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यामध्ये उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे यापैकी काही ठिकाणी 23 एप्रिलला देखील पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही भागांमध्ये तुरळक, तर काही ठिकाणी वादळी, वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी वारे हे 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने धावतील.

तसेच उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यात 21 आणि 22 एप्रिल रोजी विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वारे हे 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने धावतील. त्यामुळे शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी. शक्यतो पाऊस rain आणि वादळी वारे सुरु झाले तर घराबाहेर पडणं टाळा किंवा सुरक्षित स्थळी थोडावेळ आराम करा. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: