किमया शेअर बाजाराची …म्हणून त्यांनी बंगल्याचं नाव चक्क ‘शेअर मार्केटची कृपा’ ठेवलं!

किमया शेअर बाजाराची …म्हणून त्यांनी बंगल्याचं नाव चक्क ‘शेअर मार्केटची कृपा’ ठेवलं!

आगळ्या-वेगळ्या बंगल्याची सर्वत्र चर्चा

बदलापूर : अण्णांची कृपा, पप्पांची कृपा, देवीची कृपा, देवाची कृपा, यांसारख्या ”टिंबटिंबची कृपा’वाल्यापाट्या रिक्षा-टॅक्सी-ट्रकच्या मागे हमखास दिसतातच! काही प्रमाणात ही अशीच नावं घरांना दिल्याचंही दिसतं. पण त्याचं प्रमाण काही फार नाही. अगदीच मोजकं. त्यातचही आपल्या व्यवसायाचं नाव देऊन त्याची कृपा मानण्यात धन्यता मानणारा अवलिया अजूनतरी पाहण्यात आलेला नाही. म्हणजे रिक्षावाल्यानं कधी आपल्या बंगल्याचं नाव रिक्षाची कृपा असं ठेवल्याचं पाहिलंय का कधी तुम्ही? किंवा अगदी एका मंत्र्याच्या बंगल्याचं नाव राजकारणीच कृपा पाहिलंय का कुठं? नाही ना? त्यामुळेच ज्या बंगल्याच्या नावाची आपण वाह वाह करतो, ते खास आहे. बदलापुरातील (Badalapur) एका माणसानं आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्राचं नाव बंगल्याला देऊन अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय.

बंगल्याच्या नावाची चर्चा!

बदलापुरातल्या या बंगल्याचं नाव आहे, चक्क शेअर मार्केटची कृपा!

काहीचं लगेच पचनी पडणारं नसलं, तरी असं नाव ठेवण्यामागे काहीतरी कारण असणार हे तर नक्की. नावातूनच कारण कळावं, इतके सहज संकेत नाव ठेवणाऱ्यानं दिलेत. अर्थात ज्यानं नाव ठेवलंय, ते या सगळ्याशी संबंधितही असणारच. शेअर मार्केटची कृपा असं बंगल्याचं नाव ठेवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे मुकुंद खानोरे.

शेअर मार्केटमधील मोठं नाव

मुकुंद खानोरे हे मूळचे बदलापूरचे. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केला. त्यानंतर त्यांनी जम बसवत शेअर मार्केटमध्ये चांगलं नावही कमावलं. आपल्या अनुभवणाच्या आणि मेहनतीच्या जोरावर खानोरे हे आज शेअर मार्केट क्षेत्रातील एक तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.

शेअर मार्केटमधील तज्ज्ञ

…म्हणून असं नाव ठेवलं!

शेअर मार्केटमध्ये नाव कमावल्यानंतर कोट्यधीश बनलेले खानोरे यांनी बदलापुरातील कासगावमध्ये मोठी जागा विकत घेतली. याच जागेत त्यांनी बंगलाही बांधला. याच बंगल्याला त्यांनी नाव शेअर मार्केटची कृपा. शेअर मार्केटमुळे आपल्याला आर्थिक भरभराट झाल्याचं मुकुंद यांनी टीव्ही ९शी बोलताना सांगितलंय. आपल्याला यश ज्या क्षेत्रानं दिलं, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपल्या बंगल्याला शेअर मार्केटची कृपा हे नावं दिलं, असंही त्यांनी म्हटलंय.

ग्लोबल न्युज नेटवर्क: