अक्षराच्या साखरपुड्याच्या फोटोंवरील एक्स बॉयफ्रेंडच्या कमेंटनं वेधलं लक्ष

 

मुंबई | झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ने प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ लोटला आहे. या मालिकेला आणि या मालिकेतील राणादा आणि अंजली बाईंची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती.मालिकेतील राणादा आणि पाठकबाईं खऱ्या आयुष्यातही पती-पत्नी होणार आहेत. 3 मे रोजी दोघांचा साखरपुडा पार पडला. हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधरचे साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले.

हार्दिक आणि अक्षयाने फोटो शेअर करताच त्यावर सेलिब्रेटींनसह चाहत्यांनीही दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. अक्षयचा फोटोवरील एक कमेंटनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ती कमेंट आहे सुयश टिळकची. सुयशने अक्षया आणि हार्दिकला शुभेच्छा दिल्यात. अक्षया आणि सुयश एकमेकांना डेट करत होते.

मात्र सुयश नि अक्षराने आपलं नातं कधीच स्वीकारलं नाही. या दोघांनी कधीच आपले नात्याविषयी मनमोकळेपणाणे कबुली दिली नसली तरी सोशल मीडियावर दोघेही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसायचे.सुयश टिळक आणि अक्षया देवधरचं ब्रेकअप झाल्यानंतर इन्स्टावर एकमेकांना अनफॉलो केलं होतो. आज मात्र सुयशनं अक्षयाला तिच्य़ा नवीन प्रवासाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

Team Global News Marathi: