अकबरुद्दीन ओवैसीचे अभिनेत्री रवीना टंडन कडून समर्थन

 

एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये आले होते. त्यांनी औरंगाबादमधील मुघल बादशहा औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले होते, त्यामुळे एकच गदारोळ झाला होता. भाजपने यावरून एमआयएम आणि शिवसेनेवर निशाणा साधला होता. आता अभिनेत्री रवीना टंडनने या वादात उडी घेतली आहे. रवीनाने अकबरुद्दीन ओवैसी यांचे समर्थन केले आहे. तसेच प्रत्येकाला कशाचीही पुजा करण्याचा हक्क आहे असे रवीनाने म्हटले आहे.

आनंद रंगनाथन या उजव्या विचारसरणीच्या लेखकाने अकबरुद्दीन ओवैसी यांचा औरंगजेबाच्या कबरीजवळ नतमस्तक होताना एक फोटो ट्विट केला आणि त्यात म्हटले होते की, ज्यांनी गुरु तेग बहाद्दुर यांचा शिरच्छेद केला, ज्याने संभाजी महाराजांना हाल हाल करुन मारले, ज्याने चाळीस लाखहून अधिक हिंदूंची कत्तक केली अशा व्यक्तीच्या कबरपुढे नतमस्तक होणे अतिशय चुकीचे आहे, तसेच प्रकारे कबरपुढे नतमस्तक होणे हे कुराणमध्ये चुकीचे असल्याचेही रंगनाथन यांनी म्हटले होते.

हे ट्विट रीट्विट करून रवीनाने म्हटले आहे की, आपण सुरूवातीपासून सहिष्णून आहोत आणि राहणार, भारत हा लोकशाही असलेला देश असून कोणी कुणापुढेही नतमस्तक होऊ शकतं, हे स्वातंत्र्य तुम्हालाही आहे, हे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. तसेच सध्या आपल्या मातृभूमीला असहिष्णू म्हणण्याची फॅशन आली आहे. अशा घटनांमुळे आपण किती सहिष्णू आहोत हे सिद्ध होत आहे. आणि अशा घटनांमुळे समजतंय की आपण किती सहिष्णू असू शकतो मग कुठे आहे असहिष्णूता असा सवालही रवीनाने विचारला आहे.

Team Global News Marathi: