अजूनही 20-25 आमदारांचे आम्हाला छुपं समर्थन, बावनकुळेंचा मोठा दावा

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या. शिंदे-फडणवीस सरकार दोन महिन्यात पडेल असा दावा खासदार संजय राऊत यांनी केले होते . यावर उत्तर देत बावनकुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजूनही 20-25 आमदारांचा छुपं समर्थन आम्हाला असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत. सरकार मजबूत असून आमची आताची 164 आमदारांची संख्या पुढे 184 पर्यंत जाईल.

संजय राऊत यांनी काळजी करण्याची गरज नाही. अजूनही 20-25 आमदारांचा छुपं समर्थन आम्हाला आहे. त्यामुळे सरकार पाडण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना रेडे म्हणणं योग्य नाही. ज्या दिवशी तुम्ही त्यांना धनुष्यबाण दिले होते त्या दिवशी ते माणूस होते, शिवसैनिक होते, निष्ठावंत कार्यकर्ते होते.

मात्र आता ते तुमच्या हुकूमशाहीमुळे उद्ध्वस्त झाले, आता तुम्ही त्यांना रेडे म्हणत आहात. त्यांना लाखो लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांना रेडे म्हणणं लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनतेचा अपमान आहे. आता संजय राऊत यांनी अशी भाषा सोडावी आणि पक्ष सांभाळावा,असा सल्ला बावनकुळे यांनी दिला आता या टीकेला राऊत काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: