अजितदादा, तुम्ही २०२४ च्या अगोदरच जेलमध्ये असाल, निलेश राणे यांनी साधला पुन्हा निशाणा |

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करताना दिसून आले आहेत. त्यात भाजपा कार्यकारणी बैठकीत अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी एकमुखाने करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आताभाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवरांना डिवचनयचा प्रयत्न केला असून लवकरच आपण जेलमध्ये जाणार आहात असे विधान राणे यांनी केले आहे.

 

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, अजित पवार आता तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. तुम्ही जेवढी मस्ती केली ती या आयुष्यातच भरावी लागणार… कोणालाही उर्मट बोलायचं, कोणाचे राजकीय किंवा कौटुंबिक आयुष्य उध्वस्त करायचं, नियती कोणाला सोडत नाही अजित पवार. २०२४ ला तुमचा पराभव बघायचा होता पण तुम्ही त्या अगोदरच जेलमध्ये असाल असे निलेश राणे यांनी म्हंटल आहे.

काय आरोप लावले आहेत भाजपने |

अनिल देशमुख यांच्या वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकश अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी भाजप कार्यकारिणीने केली आहे.

Team Global News Marathi: