अजित पवार यांच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे? सर्वेक्षणातून जनतेने दिल कौल

 

मुंबई | राज्यात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते नेते अजित पवार हे नाराज असून भाजपाबरोबर जाणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात होत होती अशातच सकाळ समूहाला दिलेल्या मुलाखतीती अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्यास आवडेल असे विधान करून राज्याच्या राजकारणात चर्चेला विषय दिला होता यात भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी बॅनर झळकावले होते.

अजित पवार हे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि शरद पवार यांचे पुतणे आहेत. अजित पवार मुख्यमंत्री पदी नेमके कसे विराजमान होणार? अजित पवार बंड करणार का? शरद पवारांची साथ सोडून अजित पवार भाजपमध्ये जाणार? असे अनेक प्रश्न राज्याच्या राजकारणात चर्चेत होते. पण यामध्ये आणखी एक प्रश्न चर्चेत होता, तो म्हणजे, अजित पवार यांच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे का? याच प्रश्नाच्या आधारावर सी-व्होटरनं एका प्रसिद्ध मद्यमांसाठी सर्वेक्षण केलं आहे. या प्रश्नावर बोलताना जनतेनं आपलं मत व्यक्त केलं आहे. जाणून घेऊयात सविस्तर…

अजित पवार यांच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे?

होय : 30 टक्के
नाही : 33 टक्के
माहित नाही : 37 टक्के

सी व्होटर सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, 30 टक्के लोकांनी सांगितलं की, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. मात्र, सध्याच्या विरोधी पक्षनेत्याकडे मुख्यमंत्री होण्याची क्षमता नाही, असं मानणारे सर्वाधिक 33 टक्के लोक आहेत. तसेच, अजित पवार यांच्यात क्षमता आहे की नाही, याबाबत काहीच अंदाज नसल्याचं 37 टक्के लोकांचं म्हणणं आहे.

Team Global News Marathi: