अजित पवार यांना कोरोनाची सौम्य लक्षणे, वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा

 

बारामती | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे आहेत. त्यांचा वैद्यकीय अहवाल अद्याप आला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून ते दिवाळी निमित्त आयोजित कौटुंबीक आणि इतर काही सोहळ्यांना उपस्थित राहिले नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. शरद पवार हे दिवाळी निमित्त प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी ही माहिती दिली.

बारामती येथील गोविंदबाग येथे शरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करतात. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे. दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र येतात. या वेळी शरद पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधतात. पवार यांनी यंदाही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांच्या अनुपस्थितीतीबाबत विचारले

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या घरी काम करणारे दोन नोकर आणि आणखी काही लोकांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे वैद्यकीय अहवालातून पुढे आले आहे. त्यामुळे आजच्या कौटुंबीक कार्यक्रमासाठी घरातील सर्व लोक उपस्थित असताना धोका टाळण्यासाठीच आम्ही सर्वांनी अजित पवार यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला असल्याचे पवार यानी म्हटले.

Team Global News Marathi: