“अजित पवार इतके आक्रमक नेते की, काल मुंबईत.” राणेंनी लगावला टोला

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर जळाल्या हल्ल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपच्या फेऱ्या झाडताना दिसून येत आहेत अशातच भाजपा नेते नितेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे “अजित पवार महाराष्ट्राचे आक्रमक नेते समजले जातात. ते इतके आक्रमक आहेत की काल शरद पवारांच्या घरा बाहेर भानगड झाली तरी मुंबईत येण्याची त्यांच्यात हिंम्मत नव्हती.”, असा खोचक टोला भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत लगावला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या घराबाहेर आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. यावरूनच अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. तर या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री वळसे-पाटील यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

दरम्यान या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी १०४ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर या घटनेनंतर अजित पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. चिथावणीखोर भाषा कुणी वापरली? त्यांच्या भावना कुणी भडकवल्या? नको त्या गोष्टी त्यांच्या डोक्यात घातल्या. हे लोक असा विचार करणारे नाहीत. पण कुणीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी होती. ते शोधून काढण्याचं काम पोलीस विभागाचे आहे. दिलीप वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. लवकरच कुणी हे केलं याचा तपास लागेल. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: