कोल्हापूर कशाला गोव्यातील मतदारसंघांमध्ये ईडी चौकशी लावा – संजय राऊत

 

मुंबई | कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचे राजकारण तापत आहे. अशातच कोल्हापूरमध्ये मतदारांच्या खात्यात पेटीएमद्वारे पैसे पाठवण्याचा प्रयत्न होत आहे. मतदारांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यावर ईडी चौकशीसाठी पत्र लिहिणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर देताना महाराष्ट्र कशाला गोव्यातील २ आणि पाच राज्यांतील मतदारासंघात ईडी चौकशी लावा असा पलटवार केला आहे. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य मनोरंजक असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. कोल्हापूरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांची माहिती आणि मोबाईल नंबर गोळा करण्यात येत आहे असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

शिवसेना खासदार चंद्रकांत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघात केला आहे. कोल्हापूरातील मतदारांना हजार रुपये पेटीएमद्वारे वाटण्यात येत असल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. तसेच याची ईडी चौकशीची मागणी करणार असल्याचे पाटील यांनी केली होती.

यावर संजय राऊत म्हणाले की, कोल्हापूर उत्तरची कशाला गोव्यात पणजी मतदारसंघ आणि साखळी मतदारसंघातील मतदारांवर आधी ईडी लावा, उत्तर प्रदेशमध्येही काही मतदरासंघात ईडी चौकशी लावा, इतर राज्यांच्या मतदारसंघातही जरी भाजपचा पराभव झाला असला तरी ईडी लावणे महत्त्वाचे आहे. चंद्रकांत पाटील यांनी चांगली सूचना केली आहे. असे संजय राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: