मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट लिहिणाऱ्याला इसमाला शिवसैनिकांकडून चोप

 

जळगाव | शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात सध्या सोशल मीडियावर टीकेचा भडीमार होताना दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयाविरोधात विरोधकांसह सामान्य नागरिकांनी यावर रोखठोक मानत मांडले होते तसेच काही ठिकाणी अक्षेपार्ह भाषेचा वापर सुद्धा करण्यात आल्याचे नजरेस पडले होते.

अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्याच्या मुद्द्यावरुन जळगावमध्ये एका व्यक्तीला शिवसैनिकांनी मारहाण केल्याची घटना घडलीय. जळगाव जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमधील ही अशी दुसरी घटना आहे. ही व्यक्ती ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी गेली असता तिला या पोस्टसंदर्भात जाब विचारत चित्रपटगृहाच्या बाहेरच मारहाण करण्यात आली. हा संपूर्णप्रकार जिल्ह्यातील धरणगाव शहरात घडला.

समोर आलेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील हेमंत द्वितीये यांनी सोशल मीडियावरील जळगाव शहरातील एका ग्रुपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. या पोस्टमुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली. ही पोस्ट सोशल मिडीयावर टाकल्यानंतर हेमंत द्वितीये शहरातील आयनॉक्स चित्रपटगृहामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी आले होते. यावेळी शिवसैनिकांनी पळत ठेऊन त्यांना चित्रपट गृहाबाहेर शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली होती.

तसेच हेमंत द्वितीये यांच्याकडून शिवसैनिकांनी या पोस्टसंदर्भात माफी मागून घेतली. “माझ्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली. त्याबद्दल मी माफी मागतो” असं म्हणत हेमंत यांनी माफी मागितल्यानंतर त्यांना शिवसैनिकांनी सोडून दिलं.

Team Global News Marathi: