नारायण राणेंविरोधात ‘कोंबडी चोर’ उल्लेख करत शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांची बँनरबाजी

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. नाशिकमध्ये राणेंच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी नाशिकचे एक पोलीस पथक चिपळूणला रवाना झाले आहे. तर दुसरीकडे नारायण राणेंविरुद्ध मुंबईत देखील शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राणेंच्या विरुद्ध मुंबईत पोस्टरबाजी सुरु झाली असल्याचे दिसत आहे.

मुंबईतील दादर टीटी भागात शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणे यांचा मोठा फोटो बॅनरवर लावला आहे. त्यावर ‘कोंबडी चोर !!!’ असे नारायण राणेंना झोंबणारे शब्द लिहिले आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून याचे आणखी तीव्र पडसाद उमटण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे-शिवसेना वाद आंही चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झाले आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश आहेत. नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना दरम्यान चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नारायण राणेंकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Team Global News Marathi: