…पुन्हा मालिकांचे एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर गंभीर आरोप

 

आर्यन खान अटकेवरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी आणि अधिकारी समीर वानखडे यांच्यावर गंभीर आरोप लागवत एकाच खळबळजनक खुलासा केला आहे. कोरोना काळात संपूर्ण हिंदी चित्रपट सृष्टी मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्याठिकाणी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

 

मलिक यांनी मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करून समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते असा आरोप समीर वानखेडे यांच्यावर केला आहे. समीर वानखेडे दुबईमध्ये होते का? त्यांच्या लेडी डॉन मालदीवमध्ये गेल्या होत्या का? असं मलिक यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा बॉलीवूड क्षेत्रात एकाच खळबळ उडाली आहे.

सुशांतसिंग राजपुतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची बदली एनसीबीमध्ये करण्यात आली. त्यानंतर त्यांनी रिया चक्रवर्तीला अटक केली. फक्त 4-4 हजारांच्या पेमेंटवर गुन्हा दाखल केला. व्हॉट्सअँप चॅटच्या आधारावर फक्त त्यांना एनसीबीच्या दारात उभं केलं आहे आणि दहशत निर्माण केली आहे. तसेच सर्व वसुली ही मालदीव आणि दुबईमध्ये झाली, असा थेट आरोप मलिक यांनी केला आहे.

Team Global News Marathi: