वानखेडेंची अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होईल – नवाब मलिक

 

क्रूझ ड्रग्ज पार्टीवर छापा अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलाला अटक केल्यामुळे चर्चेत आलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सातत्यानं आरोप करत आहेत. आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी निशाणा साधला होता तसेच अटकेची मागणी केली होती.

समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली केली आहे. याप्रकरणाची चौकशी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील.मुंद्रा पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट येथे हजारो कोटींचे अमली पदार्थ मिळाल्यानंतरही एनडीपीएस कायद्यातंर्गत कारवाई का होत नाही, असे प्रश्न उपस्थित करत आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर हल्लाबोल केला.

दरम्यान काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले. काल जयदीप राणा या ड्रग पेडलरबद्दल मी काही तथ्य माध्यमांसमोर ठेवले. मात्र तेव्हापासून एक अपप्रचार सुरु आहे की, मी फडणवीस यांच्या पत्नीला या प्रकरणात खेचत आहे. मात्र हा आरोप चुकीचा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी सांगितले.

Team Global News Marathi: