भाजपचा धुव्वा! दादरा आणि नगर हवेलीत शिवसेनेचा भगवा फडकला, कलाबेन डेलकर विजयी

भाजपचा धुव्वा! दादरा आणि नगर हवेलीत शिवसेनेचा भगवा फडकला, कलाबेन डेलकर विजयी

दादरा-नगर हवेलीचे माजी खासदार मोहन डेलकर यांनी मुंबई आत्महत्या केली होती. यावरून शिवसेना-भाजपमध्ये मोठ राजकारण रंगलं होतं. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवरून भाजप नेत्यांवरही आरोप झाले होते. यानतंर शिवसेने भाजपला आव्हान देत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना पोटनिवडणुकीत उतरवलं. या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचा धुव्वा उडवला असून कलाबने डेलकर यांचा ४५ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजय झाला आहे.

भाजपचा धुव्वा! दादरा आणि नगर हवेलीत शिवसेनेचा भगवा फडकला, कलाबेन डेलकर विजयी

दादरा-नगर हवेलीः दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या  पोटनिवडणुकीत मतमोजणीच्या बावीस फेऱ्या झाल्या आहेत. पोटनिवडणुकीत माजी खासदार मोहन डेलकर  यांची पत्नी शिवसेनेच्या  उमेदवार कलाबेन डेलकर यांनी विजय  मिळवला आहे. कलाबेन डेलकर यांनी ४७,४४७ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे.

कलाबेन डेलकर यांनी भाजपचे उमेदवार महेश गावित यांचा सपाटून पराभव केला आहे.दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत २२ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर कलाबेन डेलकर यांना १,१२,७४१ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार महेश गावित यांना ६३,३८२ मते मिळाली, अशी अपडेट निवडणूक आयोगाच्या वेबसाइटने दुपारी २:०५ वाजता दिली आहे.

दादरा – नगर हवेली आणि दमण – दीव या केंद्रशासित प्रदेशाचा भाग असलेल्या जागेसाठी ३० ऑक्टोबरला मतदान झाले होते.

अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या निधनामुळे लोकसभेच्या या जागेसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागली. मोहन डेलकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकी भाजपचे तत्कालीन विद्यमान खासदार नटूभाई पटेल यांचा ९,००१ मतांनी पराभव करत विजय मिळवला होता. मोहन डेलकर यांनी २२ फेब्रुवारी २०२१ ला मुंबईतील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. डेलकर हे आधी काँग्रेस आणि नंतर भाजपमध्येही होते.

मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीतून तब्बल ७ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: