त्या अनुभवानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील – जयंत पाटील

त्या अनुभवानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील – जयंत पाटील

पुणे – पुणे मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. पदवीधर मतदारसंघाच्या याद्या उशिरा जाहीर झाल्या. यामध्ये दुबार नावे, एकच मोबाईल नंबर, चुकीचे पत्ते, अशा अनेक त्रुटी आहेत. या मतदारांपर्यंत प्रचारयंत्रणा पोहोचू नये, म्हणून कोणीतरी असे केले आहे. याविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

आम्ही फडणवीसांना टरबुज्या म्हणत नाही, चंपा म्हटल्यावर चंद्रकांत पाटलांनी राग मानू नये.देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी कधी टरबुज्या म्हणत नाही. चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे. त्यांनी राग मानून घेऊ नये, असा टिपणी जयंत पाटलांनी केली. अशाप्रकारे कोणाचाही अपमान करण्याला राष्ट्रवादी काँग्रेस समर्थन देत नाही. शरद पवार यांनी आम्हाला अशा गोष्टी शिकवल्या नाहीत.राज्यात गेल्यावर्षी अजित पवार यांना हाताशी धरुन भाजपकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयोगाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे.

 

या पार्श्वभूमीवर सोमवारी महाविकासघाडीतील नेत्यांनी शपथविधीच्या आठवणींना उजाळा देत एकप्रकारे भाजपच्या जखमेवर मीठ चोळले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत मिश्किल टिप्पणी केली. त्या अनुभवानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आता पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. मात्र, आता त्या कटू आठवणी काढण्यात अर्थ नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

 

तसेच महाराष्ट्राला आता भाजपची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. प्रवीण दरेकर यांनी पदवधीर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर होण्याचा दावा केला. बरं झालं ते पदवीधर निवडणुकीनंतर सत्तांतर होईल, असे बोलले. निवडणुकीआधी होईल, असे बोलले नाहीत. मात्र, आता राज्याला भाजपची गरज नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: