संजय राऊत नंतर शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर

संजय राऊत नंतर शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा संजय राऊत यांची पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी सोमवारी दुपारी १ वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर होते. आता आणखी एका शिवसेनेच्या माजी खासदाराची चौकशी होणार आहे.

हा नेता शिवसेनेचा माजी खासदार असून अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या एका स्थानिक नेत्याचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) आणि पीएमसी बँकेत झालेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी या नेत्याची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया या वृत्त समूहाने दिले आहे.

सोमवारी खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चार तास चौकशी करण्यात आली. प्रवीण राऊत हे पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.

माधुरी राऊत यांनी २३ डिसेंबर २०१० रोजी वर्षा राऊत यांच्या खात्यात ५० लाख आणि १५ मार्चला ५ लाख रुपये जमा केले होते. हे बिनव्याजी कर्ज असल्याचे सांगण्यात येते. या पैशातून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये सदनिका विकत घेतली होती अशी माहिती समोर येत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: