मोदींना फोनवर विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलाय तुम्ही – अतुल भातखळकर

मोदींना फोनवर विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलाय तुम्ही – अतुल भातखळकर

मुंबई महापालिकेत गुरुवारी हेरिटेज वॉक कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटनाला महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आदी नेत्यांनी हजेरी लावली होती.

अजित पवार व बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीवरून उद्धव ठाकरे यांनी मिश्किल वक्तव्य केलं. ‘मी विधानसभेत तुमच्यामुळे, तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे आहात’ असं विधान करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. आता उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याचा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी समाचार घेतला आहे.

 

अतुल भातखळकर यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘उद्धव ठाकरे विधानसभेत? कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवली आणि जनतेने तुम्हाला कधी निवडून दिलं? मोदींना फोनवर विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलात तुम्ही. त्यामुळे विधानसभेत जाता येते तुम्हाला’ असा घणाघात त्यांनी केला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: