राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी आलो आणि अडकलो – अजित पवार

राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी आलो आणि अडकलो – अजित पवार

राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी राजकारणात आलो आणि अडकलो, कुठं जाता येईना आणि बाहेरही पडता येईना असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर एकाच हशा पिकला होता.

पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी अजित पवारांनी विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे विधान केले होते. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे नवे माध्यम स्वीकारले पाहिजे. ऑनलाईन शिक्षण सुरु आहे, पण कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना अजितदादा म्हणाले की, आम्ही कधीपर्यंत खुर्चीवर, तर जनतेने सांगितले तोपर्यंत. जनता म्हटली घरी बसा, की चाललो आम्ही. पण सीईओ बघा.. जोपर्यंत रिटायर होत नाही, तोपर्यंत खुर्चीवर असतो. शिवाय प्रमोशन होत जाते. अभिनेता, कला, संगीत, पत्रकारिता अशी वेगवेगळी क्षेत्र निवडू शकता. असे क्षेत्र निवडा ज्यातून आनंद आणि पैसे मिळतील, याचा विचार करा. नाहीतर घरात गेला की भांडी आदळली नाही पाहिजे, ‘आला मेला’ असे नाही झाले पाहिजे, असं अजित पवार म्हणताच हशा पिकला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: