चिंताजनक: दोन केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण

ग्लोबल न्यूज: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सोबत स्मृती इराणीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. त्यानी स्वत: आपल्या ट्विटर हँडलवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की कोणत्याही प्रकारचे घोषणा करणे यासंबंधित शब्द शोधणे मला थोडे अवघड आहे, परंतु मला ते सोप्या शब्दात सांगायचे आहे – मला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे आणि माझ्या संपर्कात असलेल्या प्रत्येकांनी आपली काळजी घेत कोरोना चाचणी करून घ्यावी.

नुकत्याच स्मृती इराणी बिहारमध्ये होत्या.तेथे त्यांनी निवडणूक सभा घेतली. केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या स्टार प्रचारक स्मृती इराणी यांनी गोपाळगंजमध्ये निवडणूक बैठक घेतली. भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी,रामदास आठवले हे त्यापैकी एक आहेत.

कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने रामदास आठवले यांनी सोमवारी कोरोना चाचणी करून घेतली होती. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आठवले यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच संपर्कात आलेल्या इतर कार्यकर्त्यांनीही कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असं आवाहन आठवले यांनी केलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: