विधानसभा निवडणूक स्वबळावर लढावी, नाना पटोले यांच्यानंतर काँग्रेसच्या या नेत्याने ओढला सूर |

मुंबई |  राज्यात शिवसेना पक्षाने राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली होती. मात्र सत्ता स्थापन झाल्यानंतरही तिन्ही पक्षांमध्ये वाद होत असल्याचे चित्र दिसून आले होते. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येणाऱ्या आगामी विधानसभा आणि लोकसभा स्वबळावर लढण्याचे वक्तव्य केले होते. आता त्या पाठोपाठ काँग्रेसच्या आणखी एका माजी मंत्र्यांने नाना पटोले यांच्या वक्तव्याला समर्थन देत काँग्रेसने निवडणूक स्वबळावर लढावी असे विधान केले आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवल्या पाहिजेत ही प्रदेशाध्यक्ष पटोले यांची भूमिका रास्तच आहे. पटोले यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असून आपले या भूमिकाला समर्थन असल्याचे खान म्हणाले आहेत. रविवारी पत्रकार माध्यमाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे. आता नसीम खान यांच्या या विधानावरून आघाडीत सर्वकाही आलबेल नाहीये असेच दिसून येते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्वात जुना पक्ष असून याआधी तो राज्यातही नंबर एकचा पक्ष राहिला आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षे काँग्रेसने एकहाती सत्ता आणलेली आहे. काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात आजही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार असून स्वबळावर निवडणुका लढल्यास पक्ष संघटनाही मजबूत होण्यास मदत होईल. राज्यातील पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावरच लढवाव्यात ही भूमिका रास्त आहे, असे खान म्हणाले.

Team Global News Marathi: