मुंबईत दाखल होताच परमबीर सिंह चौकशीच्या जाळ्यात

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असणारे परमबीर सिंह यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाल्याचे दिसत आहे. कारण मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह यांना आता सीआयडी चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी सीआयडी परमबीर सिंह यांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सीआयडीकडून दोन गुन्ह्यात परमबीर सिंग यांना समन्स बजावले असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवशी चौकशीला हजर राहण्याचे समन्स त्यांना पाठवले आहे. मरीन ड्राईव्हमधील श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना समन्स देऊन चौकशीला सोमवारी बोलावण्यात आले. ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात परमबीर सिंग यांना मंगळवारी हजर राहण्यासाठी समन्स देण्यात आले असल्याची माहिती आहे.

ठाण्यातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातून सीआयडीला वर्ग झालेल्या भीमराव घाडगे यांच्या तक्रारीचा अट्रोसिटीच्या गुन्ह्यात परमबीर यांचा जून महिन्यात जबाब सीआयडीने नोंदवला आहे. अट्रोसिटी गुन्ह्यात चंदीगढला जाऊन परमबीर यांचा जबाब सीआयडीकडून नोंदवण्यात आला असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे.

Team Global News Marathi: